Ad will apear here
Next
काळा घोडा फेस्टिव्हल : अनोख्या महोत्सवाची यंदाची वैशिष्ट्ये


मुंबईतील प्रसिद्ध काळा घोडा महोत्सवाचा समारोप यंदा नऊ फेब्रुवारी २०२० रोजी होत आहे. या अनोख्या कला महोत्सवाच्या वैशिष्ट्यांची ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी छायाचित्रांसह करून दिलेली ही तोंडओळख...
......
काळा घोडा हा एकमेव असा कला महोत्सव आहे, की ज्यात कलेची मांडणी रस्त्यावर केली जाते. तसेच दृकश्राव्य माध्यमे आणि व्याख्याने इत्यादींसाठी कलेशी निगडित असलेल्या पुरातन इमारती, बाग व मैदानांचा वापर केला जातो. मुख्य रस्ता, वृक्ष व आजूबाजूचे कला-सौंदर्यपूर्ण वातावरण हेच या रस्त्याचे टेकू (props) आहेत. फारशी लांबी नसलेल्या मुंबईतील रॅम्पार्ट रोडवर एका बाजूस धनिकांच्या आवडीनिवडी जपणाऱ्या इमारती आहेत, तर दुसऱ्या बाजूस कलेला प्रोत्साहन देणाऱ्या व प्रदर्शन करणाऱ्या जगप्रसिद्ध इमारती आहेत. कलासौंदर्य व देश-विदेशी वास्तुशैलीत नटलेल्या ब्रिटिशकालीन पुरातन इमारती, बाग-बगीचे इत्यादींचा समूह हे या परिसराचे वैशिष्ट्य आहे. हा परिसर ‘काळा घोडा आर्ट सर्कल’ या नावाने प्रसिद्ध आहे. (काळा घोडा महोत्सवाचा इतिहास आणि अन्य संबंधित बाबींची सविस्तर माहिती देणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)



शहरी जीवनातील प्रत्येक बाबतीत विशाल दृष्टिकोन बाळगणाऱ्या मुंबईसारख्या महानगरात अनेक धर्म, पंथ व जातीचे नागरिक राहतात. हिंदू धर्मानुसार कृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव व नवरात्र असे उत्सव होतात. हे उत्सवदेखील रस्त्यावरच साजरे केले जातात. तसेच इतर धर्मातील उत्सवदेखील साजरे होतात. त्यामुळे वर्षभर निरनिराळ्या कारणांनी शहरातील चैतन्य जपले जाते. परंतु फारशी गर्दी नसलेल्या दक्षिण मुंबईतील के. दुभाष रोड (रॅम्पार्ट रोड) या रस्त्याची खासियत वेगळीच आहे. प्रति वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धर्म, पंथ व जातीचे बंधन नसणाऱ्या कलावंतासाठी ‘काळा घोडा कलामहोत्सव’ याच रस्त्यावर साजरा केला जातो. 



महोत्सवातील केवळ कलेचा आनंद घेण्यासाठी कलाप्रेमी गर्दी करतात. परंतु या महोत्सवात भेट देणारा प्रत्येक दर्शक कलेची आवड जोपासणारा असतोच असे नाही. यातील बहुतांश दर्शकांना हवं असतं फक्त झोकून देण्यासाठी लागणारं मोकळेपण, स्वातंत्र्य व सेल्फीसाठी टेकू! आता सेल्फी काढणे अति सोपे झाले आहे. महोत्सवात मांडलेल्या कलाकृतीसमोर पोज घेऊन सेल्फी काढणे हेच जमलेल्या गर्दीस एकमेव वेड असते!

तरीही रोजच्या जीवनात सतत धावपळीचे जीवन जगणाऱ्या मुंबईकरास वाहने, फेरीवाले व माणसांच्या गर्दीमुळे मोकळा रस्ता, तसेच रस्त्याची पाठ न सोडणारी वृक्षसावली व आजूबाजूच्या वातावरणातील सौंदर्यदेखील क्वचितच नजरेस पडते. विकास व पर्यावरणाचा योग्य समतोल न साधल्यामुळे सावली देणाऱ्या वृक्षांची संख्यादेखील कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, काळा घोडा महोत्सवाचे वातावरण एक वेगळी ऊर्जा देते.

सूर्यप्रकाशामुळे पडलेली सावली, मावळतीचा संधीप्रकाश, कृत्रिम विद्युत रोषणाईचा झगमगाट व रंगबेरंगी, चित्रविचित्र पेहरावातील कलाप्रेमी येथे पाहायला मिळतात. विविध प्रकारच्या कला-सौंदर्यपूर्ण निर्मितीतून आलेले वेगळेपण नेमके काय असते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची मजा काही औरच असते! महोत्सवी रस्ता, वृक्षसावली, पर्यावरण व वास्तुकला-सौंदर्याच्या दृष्टिकोनातून केलेला वेगळा विचार व त्याचे महत्त्व छायाचित्र व शब्दरूपात मांडण्याचा हा एक प्रयत्न!
............ 
दी सोशल थ्रेड

दी सोशल थ्रेड :
प्रचलित विविध समाजमाध्यमे जास्तीत जास्त मित्रांच्या संपर्कात राहता यावे म्हणून तयार केली आहेत. निरनिराळ्या माध्यमांत प्रत्येक वयोगटातील माणसे कशी गुंतली आहेत व या माध्यमांच्या आहारी न जाता खरंखुरं आयुष्य जगायला शिका हा संदेश देण्याचा प्रयत्न ह्या कलाकृतीतून केला आहे. 

दी गेम्स ऑफ थ्रेड्स

दी गेम्स ऑफ थ्रेड्स :
या कलाकृतीत, क्रिकेट खेळाडू व त्या खेळात वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तू मांडल्या आहेत. त्यातून भारतीयांना असलेले आकर्षण व क्रिकेट हा खेळ भारताला विविध देशांशी जोडणारा दुवा आहे हे प्रतीत केले आहे. 

दी वन

दी वन :
या कलाकृतीत, दोन आत्म्यांच्या मीलनातून एकात्म्याचे मीलन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 

टी सोसायटी कॉल्ड इंडिया

टी सोसायटी कॉल्ड इंडिया
: भारताच्या विविध प्रांतांत राहणारे नागरिक वेगवेगळ्या कामांत व्यग्र असतात. परंतु चहासारख्या पेयामुळे ते कसे जोडले गेले आहेत, हे या कलाकृतीत विविध ब्लॅक अँड व्हाइट छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवले आहे. 

हॉर्स

हॉर्स
: या कलाकृतीतील अश्व ‘काळा घोड्या’शी निगडित आहे. निरनिराळ्या रंगाच्या धाग्यांच्या वापरातून घोड्याची सुंदरता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 

बचपन बचाओ

ओव्हर दी टॉप – बचपन बचाओ
:  नैसर्गिक लाकडापासून बनवलेल्या भोवऱ्यास सुती धाग्याने गुंडाळून तो फिरवण्याचा छंद अनेकांनी बालवयात अनुभवला आहे. आधुनिक युगात तो छंद लोप पावत चालला आहे. लाकडी भोवरा व सुती धाग्याच्या माध्यमातून मानवी जीवन ईश्वराशी कसे जोडले आहे, हे या कलाकृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 

इंडियन फोक व्हील : भारतातील अनेक प्रांतांत विविध धर्म, पंथ व जातीचे लोक राहतात. या कलाकृतीत चक्रावर लावलेल्या वस्तू व चित्रांमधून त्यांची जीवनशैली दाखवली आहे. 

हॉर्स

फेव्हिकॉल – ए हॉर्सी :
दहा फूट उंच घोड्याच्या अंगावर लहान मुलांनी बनवलेल्या निरनिराळ्या वस्तू फेव्हिकॉलचा वापर करून चिकटवल्या आहेत. टाकाऊ वस्तू वापरून सर्जनात्मक कलाकृती निर्माण करता येते हा संदेश या कलाकृतीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. 
 
पोस्टमन : समाजमाध्यमांनी केलेल्या प्रगतीमुळे जग जवळ आले आहे. अनेक वर्षांपासून अंगवळणी पडलेली दरवाजा ठोठावून पत्र हातात देणारी व्यवस्था हळूहळू कमी होत आहे. एके काळी पत्र व पोस्टमन हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होते. भारतातील या टपाल व्यवस्थेचा प्रवास या कलाकृतीत मांडला आहे. 



ई-मेल : चंद्रशेखर बुरांडे - fifthwall123@gmail.com

(मुंबईतील काही पुरातन वास्तूंचे सौंदर्य उलगडून दाखवणारे चंद्रशेखर बुरांडे यांचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZWFCJ
Similar Posts
कलेचा वारसा जपणारा काळा घोडा महोत्सव दक्षिण मुंबईतील कलेचा वारसा जपण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या काळा घोडा महोत्सवाचे यंदाचे विसावे वर्ष आहे. कला, संगीत व स्थापत्य कलेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे कार्य हा महोत्सव करतो आहे. यंदाचा महोत्सव दोन फेब्रुवारीला सुरू झाला असून, १० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ‘काळा घोडा’ या नावामागचे रहस्य,
मुंबईतील आर्ट डेको वास्तुशैलीचे सौंदर्य मुंबईतील ओव्हल मैदान आणि मरीन ड्राइव्ह या भागांत ब्रिटिश काळात आर्ट डेको शैलीत निवासी संकुले बांधण्यात आली. या इमारती बांधताना दीर्घ काळ टिकण्याचा हेतू तर होताच; पण त्यांची रचना करताना सौंदर्यदृष्टी वापरून त्या दीर्घ काळ स्मरणातही राहतील, या पद्धतीने बांधण्यात आल्या आहेत. या शैलीबद्दल विस्तृत माहिती
पुण्यात पंधराव्या ‘बसंत उत्सवा’त नृत्य आणि गायनाने वातावरण संगीतमय पुणे : बांगिया संस्कृती संसदच्या वतीने पुण्यात नुकताच ‘बसंत उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम २०२०’ साजरा झाला. प्रचंड उत्साहपूर्ण, सकारात्मक भावना जागृत करणारा असा सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून ‘बसंत उत्सव’ प्रसिद्ध आहे. १६ फेब्रुवारी रोजी ‘एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन’मध्ये हा उत्सव साजरा झाला. यंदा कार्यक्रमाचे पंधरावे वर्ष होते
‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ मराठीतही मुंबई : शूरवीर मराठा योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावरील तान्हाजी : द अनसंग वॉरीयर हा चित्रपट आता मराठी भाषेतही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, संपूर्ण महाराष्ट्रात दहा जानेवारी २०२० रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language